मुंबई सेंट्रलपासून गांधीनगरपर्यंत जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसरेल्वेला काल ६ सप्टेंबर रोजी अपघात झाला. वटवा-मणिनगर स्थानकाजवळ म्हशींच्या कळपाला धडकल्याने या रेल्वेचे मोठे नुकसान झाले होते. या अपघातात इंडिनचा पुढचा भाग तुटला. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी वंदे भारत एक्सप्रेस दुरुस्त होऊन रेल्वे रुळावर दाखल झाली आहे.
वंदे भारत एक्सप्रेसचा पुढचा भाग मुंबई मध्य रेल्वेच्या कोचिंग केअर सेंटरमध्ये दुरुस्त करण्यात आला आहे. या रेल्वेचा फक्त पुढचा भाग खराब झाला आहे. या संदर्भात रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी माहिती दिली.
रेल्वे पटरी शेजारी असणाऱ्या गावातील लोकांना जनावरांना पटरीवर सोडू न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे गांधीनगर-अहमदाबाद सेक्शनवर ट्रेनचा वेग ताशी १६० किमीपर्यंत वाढवण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कुंपण घालण्याचे काम करणार असल्याची माहिती, ठाकूर यांनी दिली.
काल रेल्वे रुळावर अचानक ३-४ म्हैशी आल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर ८ मिनिटांत गाडी गांधीनगरकडे रवाना झाली होती आणि नियोजित वेळेत पोहोचली होती.
मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात
अहमदाबाद - मुंबई सेंट्रल येथून गुजरातमधील गांधीनगर येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला काल गुरुवारी अपघात झाला . सकाळी सुमारे ११.१५ च्या सुमासार वटवा आणि मणिनगरदरम्यान रुळांवर म्हैशींचं कळप आल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे ट्रेनच्या इंजिनाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच ३० सप्टेंबर रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हा ही गाडी अहमदाबाद येथून दुपारी २ वाजता निघाली होती. ही ट्रेन संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचली होती. नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने अहमदाबाद ते मुंबई हे ४९२ किमी अंतर साडे पाच तासांत पूर्ण केले होते.