शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Vande Bharat Train: देशातील चौथी 'वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन', उद्या PM नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 20:12 IST

Vande Bharat Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशातील चौथ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा कंदिल दाखवणार आहेत.

Vande Barat Express Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला चौथी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुपूर्द करणार आहेत. उना ते दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन मोठी भेट आहे. ट्रेन दिल्लीहून उनासाठी सकाळी 5.50 वाजता सुटेल आणि हरियाणामार्गे सकाळी 8.50 वाजता अंबाला येथे पोहोचेल. 

म्हणजेच ट्रेन सकाळी 10:34 वाजता उना रेल्वे स्थानकावर असेल आणि येथे दोन मिनिटे थांबल्यानंतर 11:05 वाजता आंब-अंदौरा येथे पोहोचेल. ही ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. यात 1000 प्रवासी क्षमता असलेले एकूण 16 डबे असतील. ही ट्रेन उना ते दिल्ली हा प्रवास अवघ्या 5 तासात पूर्ण करेल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रयत्नातून उना थेट गुजरातशी रेल्वेमार्गे जोडले गेल्याचे भाजपचे म्हणणे आहे. 

पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटनपंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबर रोजी उना जिल्ह्यात मुक्काम करणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी सुमारे 7981 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या कार्यक्रमात पंतप्रधान हरोली, उना येथे 1923 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या बल्क ड्रग पार्कची पायाभरणी करतील. तर, 5930 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उना-हमीरपूर रेल्वे मार्गाचा पायाभरणी आणि 128 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (ट्रिपल आयटी)चे उद्घाटन होणार आहे.

हिमाचलसाठी मोठी भेटया कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. उना ते दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी भेट आहे. अंबाला विभागाचे रेल्वे व्यवस्थापक गुरविंदर मोहन यांनी सांगितले की, हिमाचलहून दिल्लीला जाताना त्याचे पहिले स्टेशन अंब अंदौरा असेल आणि त्याचप्रमाणे दिल्लीहून ते उनापर्यंत धावेल आणि त्यानंतर शेवटचे स्टेशन अंब अंदौरा असेल.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी