लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतात रेल्वेगाड्यांचा वेग वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान रेल्वे विविध मार्गांवर धावत आहे. आता या गाडीचा वेग आणखी वाढविण्यासाठी देशात प्रथमच ॲल्युमिनियमचा वापर करून डब्यांची निर्मिती हाेणार आहे. या प्रयत्नांना यश आल्यास गाडीचा वेग ताशी २० किलाेमीटरने वाढण्याची अपेक्षा आहे.
भारतात सेमी हायस्पीड रेल्वे वंदे भारतचा कमाल वेग ताशी १८० किलाेमीटर एवढा आहे. या गाडीचे डबे बनविण्यासाठी प्रायाेगिक तत्त्वावर ॲल्युमिनियमचा वापर करण्याचा निर्णय झाला आहे. ॲल्युमिनियमचा वापर भारतीय रेल्वेसाठी गेम चेंजर सिद्ध हाेऊ शकताे. युराेपमध्ये हा प्रयाेग यशस्वी झाला आहे. रेल्वेने २०० वंदे भारत रेल्वेगाड्यांची निर्मिती आणि देखभालीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासाठी ५८ हजार काेटी रुपयांचे एकूण कंत्राट आहे.
स्लीपर गाडीही लवकरच येणारवंदे भारत रेल्वे ही सध्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावत नाही. त्यासाठी स्लीपर डबे बनविण्यात येणार आहेत. २०२४ मध्ये स्लीपर वंदे भारत सुरू करायची सरकारची याेजना आहे. त्यासाठी काही गाड्या ॲल्युमिनियमचा वापर करून बनविण्यात येतील. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत पहिली स्लीपर वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची रेल्वेची याेजना आहे. यशस्वी बाेली लावणाऱ्या कंपनीला २४ महिन्यांच्या आत स्लीपर वंदे भारत गाड्या बनवाव्या लागणार आहेत. तसेच ३५ वर्षांसाठी देखाभालीची जबाबदारी राहणार आहे.
nस्टीलच्या तुलनेत ॲल्यूमिनियमचे डबे महाग राहतील. n१०० वंदे भारत गाड्यांची निर्मिती ॲल्युमिनियमचा वापर करून हाेणार.