उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वाराणसीमध्ये नवरदेव बेपत्ता झाल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. बुधवारी वाराणसीच्या लक्सा पोलीस स्टेशन हद्दीतील लग्नाच्या लॉनमध्ये नवरी नटून-थटून नवरदेवाची वाट पाहत होती. घरामध्ये देखील आनंदाचं वातावरण होतं. पाहुणे मंडळी जमले होते. मात्र एका फोनने सर्वांनाच धक्का मोठा धक्का बसला आणि लग्नातील आनंदी वातावरण अचानक विरजण पडलं.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळीच नवरदेव बेपत्ता झाल्याची माहिती मुलाच्या बाजूने देण्यात आली आहे. फोनवर मुलगा गायब झाल्याची बातमी ऐकून मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांना धक्काच बसला आहे. लग्नाच्या मिरवणुकीसाठी, नवरदेवाच्या स्वागतासाठी केलेली सर्व तयारी तशीच राहिली. शिवपूर येथील रहिवासी असलेल्या शुभेंद्र दुबे यांचं लग्न शंकुलधारा येथील एका तरुणीसोबत ठरलं होतं.
नवरेदवाच्या काकांनीच हे लग्न ठरवलं होतं. मुलगा छत्तीसगडमध्ये एसडीएम पदावर तैनात असल्याची माहिती समोर य़ेत आहे. याआधीही हे लग्न तीनवेळा पुढे ढकलण्यात आले होते, 14 डिसेंबर रोजी दोन्ही कडच्या लोकांनी लग्नाला होकार दिला. लग्नपत्रिका छापून वितरीतही करण्यात आली होती, पण लग्नाच्या दिवशी आलेल्या एका फोनने त्याच्या आनंदावर विरजण पडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत कोणतीही लेखी तक्रार करण्यात आलेली नाही. तक्रार केल्यानंतर कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"