Varanasi Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. यामधील सर्वात मोठी घडामोड घडत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये एक्झिट पोलच्या अगदी उलट खेळ रंगू लागला असून भाजपा २६ तर सपा 32 जागांवर आघाडीवर आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ६००० हजार मतांनी पिछाडीवर पडले आहेत. काँग्रेसचे अजय राज आघाडीवर आहेत. अजय राय यांना आतापर्यंत 11,480 मते मिळाली आहेत.
65 जागांच्या ट्रेंडमध्ये समाजवादी पक्षाला मोठी आघाडी मिळाली आहे. समाजवादी पक्षाला 32 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याचबरोबर भाजपने 25 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे. आझाद समाज पक्ष एका जागेवर तर आरएलडी एका जागेवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसचे राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून २१२६ मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी 395 मतांनी पिछाडीवर आहेत. सहारनपूरमधून काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद १०,१६३ मतांनी आघाडीवर आहेत. तर सीतापूरमधून काँग्रेसचे राकेश राठोड ४३३१ मतांनी आघाडीवर आहेत. बाराबंकीमधून काँग्रेसचे तनुज पुनिया १०९७ मतांनी आघाडीवर आहेत.