वाराणसी - वाराणसीतील एका रिक्षा चालकाच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र त्याचा हा आनंद आता द्विगुणित झाला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिक्षा चालकाला पत्र पाठवलं आहे. रिक्षा चालकाने आपल्या मुलीच्या विवाहाची पत्रिका मोदींना पाठवली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मुलीला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देणारं एक पत्र पाठवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगल केवट असं या रिक्षा चालकाचं नाव असून ते वाराणसीतील दोमरी या गावात राहतात. हे गाव पंतप्रधान मोदी यांनी दत्तक घेतले आहे. मंगल यांनी मुलीच्या विवाहाची पत्रिका मोदींना पाठविली होती, त्यांनी दिल्लीतील पीएमओ कार्यालयामध्ये जाऊन पत्रिका दिली होती. त्यानंतर मोदींनी त्यांच्या या पत्राला उत्तर देत मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मंगल यांच्या मुलीला आणि जावयाला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं आहे.
'आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवलं होतं. 8 फेब्रुवारी रोजी आम्हाला पंतप्रधानांकडून शुभेच्छांचं एक पत्र आलं. हे पत्र पाहून आम्ही खूपच जास्त खूश झालो आहोत. नरेंद्र मोदी देशातील सर्व सामान्य लोकांची काळजी घेतात, विचार करतात याचं हे पत्र पुरावा आहे' अशी माहिती मंगल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. तसेच 16 फेब्रुवारी रोजी मोदी वाराणसीत आहे. त्यावेळी त्यांना भेटण्याची इच्छा आहे. आमच्या समस्या आम्ही त्यांना सांगू शकतो असं देखील मंगल आणि त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपा नेते गिरीराज सिंह म्हणतात, पंतप्रधान म्हणजे देवाचे अवतार
Delhi Election Results : हटके असणार केजरीवालांचा शपथविधी; ते 50 'आम आदमी' ठरणार लक्षवेधी
Delhi Election Results : अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, आज शपथ घेणार
China Coronavirus : जगभरात ६७ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग; तब्बल १६०० बळी
'मतभेदांना देशविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला'