फरकांडे, ता.एरंडोल : ग्रामपंचायतीने विविध विकास कामे मार्गी लावल्याचे सरपंच जयश्री राजेंद्र ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गावात तत्कालीन आमदार चिमणराव पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीतून ४ लाख ६८ हजार रुपये व्यायाम शाळेसाठी मंजूर केले होते. हे काम नुकतेच पूर्ण झाले. तेराव्या वित्त आयोगातून दोन मुतार्या, सात ढापे, ग्रा.पं.चे वॉल कंपाऊंड, ग्रामसभेसाठी मोठे सभागृह, इमारतीचे नूतनीकरण (सुशोभिकरण) करण्यात आले आहे. जि.प.च्या चौक सुशोभिकरण योजनेत एक हायमास्क लॅम्प मंजूर करून तो जयशिवराय चौकात लावला आहे. विद्यमान आमदार डॉ.सतीश पाटील यांनी आमदार निधीतून तीन हायमास्ट लॅम्प मंजूर केले असून ते लवकरच मुख्य चौकात लावण्यात येणार आहेत. राहिलेल्या भागाचे काँक्रिटीकरणासाठी खासदार फंडातून निधी मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे शेवटी सरपंच यांनी सांगितले. एका महिला सरपंचाकडून गावाच्या विकासाची कामे सुरू असल्याने गावात समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करा - लीलाताई पाटीलपळासखेडे बुद्रुक, ता.जामनेर : राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार या विधायक अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या शिवारात पाणी अडणार आहे. याचा फायदा गावानाच होणार आहे. त्यामुळे ज्या गावात हे अभियान राबविले जात आहे त्या गावातील ग्रामस्थांनी अभियान आपलेच आहे, असे समजून त्यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पंचायत समिती सदस्य लीलाबाई प्रकाश पाटील यांनी हिवरखेडे बुद्रुक येथे केले.जलयुक्त शिवार या अभियानाचा जिल्ात प्रचार प्रसार आणि जनजागृती करण्यासाठी कृषी व महसूल विभागामार्फत हिवरखेडे बुद्रुक येथे आलेल्या मोबाईल व्हॅन प्रचार दिंडीचे उद्घाटन लीला पाटील यांच्या हस्ते झाले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाणी आडवा पाणी जिरवा, विहीर पुर्नभरण, नवीन सिमेंट बांध बांधणे, जुने बांध खोलीकरण करणे याबाबत मंडळ अधिकारी तळेले यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यावेळी सरपंच मंगलाबाई संभाजी पाटील, उपसरपंच अरुण चौधरी, ग्रामसेवक योेगेश पालवे, कृषी सहाय्यक के.के. शिवदे, एस.एन. सावळे, प्रवीण सपकाळे, राजू पाटील, दीपक करवंदे, अमर पाटील, जितेंद्र पाटील, बाळू पाटील, वैभव महाजन, दिनेश धोबी यांच्यासह शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
फरकांडे ग्रामपंचायतीची विविध विकास कामे मार्गी -सरपंच
By admin | Published: April 20, 2015 1:40 AM