जिल्ात महावीर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
By admin | Published: April 04, 2015 1:55 AM
अकोला : जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, २ एप्रिल रोजी जिल्ात ठिकठिकाणी धर्मध्वजारोहण,जन्मकल्याणक, शोभायात्रा, आरती, पूजा-अर्चा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन आले होते.
अकोला : जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, २ एप्रिल रोजी जिल्ात ठिकठिकाणी धर्मध्वजारोहण,जन्मकल्याणक, शोभायात्रा, आरती, पूजा-अर्चा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन आले होते.बोरगावमंजू येथे जैन मंदिरात सकाळी ७ वाजता भगवान महावीरांच्या मूर्तीला जलाभिषेक व त्यानंतर अष्टद्रव्याने पूजन करण्यात आले. पुष्प,आकर्षक तोरणांंनी सजविलेल्या रथामधून भगवंताची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिलांनी महावीरांवर आधारित भजने, घोषवाक्ये म्हटली. युवक-युवतींनी नृत्य सादर केले. अखेर भगवंतांची आरती करून मिरवणुकीचा समारोप झाला. त्यानंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी महाराष्ट्र शासनाने केलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याचे स्वागत केले. भगवान महावीर जयंतीला अहिंसा दिवस घोषित करावे व सर्व प्राणिमात्रांची हत्या पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पंचरंगी ध्वजाचे व ध्वजारोहणाचे महत्त्व विशद करून संपूर्ण जगाने भगवान महावीरांच्या तत्त्वांचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी करण्यात आले. अखेरीस महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. महावीर जन्मोत्सवाकरिता नेमिनाथ सेवा दलाचे कार्यकर्ते, सरस्वती महिला मंडळासह समाजातील सर्वच घटकांनी विशेष परिश्रम घेतले.मूर्तिजापूर येथे भगवान महावीर जयंतीचा कार्यक्रम नगराध्यक्ष पवन अव्वलवार यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषदेच्या बचत भवनामध्ये गुरुवारी घेण्यात आला. यावेळी अव्वलवार व दुबे यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष अव्वलवार म्हणाले, आज प्रत्येक मनुष्य दु:खी आहे. अशा स्थितीत मानसिक शांतीसाठी प्रत्येकाला भगवान महावीरांच्या विचारांची आत्यंतिक गरज आहे. माजी नगराध्यक्ष दुबे यांनी अहिंसा या तत्त्वाचे पालन करणे ही काळाची गरज असून, त्याचे पालन करण्याचा उपदेश सर्वांना केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रभाकर हनुमंते गुरुजी यांनी केले. जैन कीर्तिस्तंभ व भगवान महावीर वाचनालयातदेखील महावीर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे माजी नगरसेवक अशोकअण्णा अव्वलवार यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जयंतीभाई हरिया यांची प्रमुख उपस्थिती होती. फोटो क्रमांक : ०३ सीटीसीएल ४०,४१ फोटोकॅप्शन : बोरगावमंजू येथील मिरवणुकीच्या अग्रभागी रथावर आरूढ भगवान महावीरांची मूर्ती व मिरवणुकीत सहभागी जैन भगिनी, बांधव.