लखनऊ/नवी दिल्ली : वास्को-द-गामा-पाटणा एक्स्प्रेसचे १३ डबे शुक्रवारी पहाटे उत्तर प्रदेशातील माणिकपूर रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात ३ ठार, अन्य ९ जण जखमी झाले.या दुर्घटनेत बिहारच्या बैत्तिहा जिल्ह्यातील पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एका व्यक्तीचा इस्पितळात मृत्यू झाला, असे चित्रकूटचे पोलीस अधीक्षक गोपेंद्र सिंह यांनी सांगितले. जखमींपैकी दोघे गंभीर आहेत. तडा गेलेल्या रुळांमुळे हा अपघात घडल्याचे सकृतदर्शनी दिसते, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद कुमार यांनी सांगितले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शोक व्यक्त करून मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची तर गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये व अन्य जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.>दुसरा अपघात टळलाउत्तर प्रदेशात शुक्रवारीच आणखी एक मोठा रेल्वे अपघात टळला. जम्मू-पाटणा अर्चना एक्स्प्रेसचे इंजिनच सहारनपूरनजीक ट्रेनपासून अलग झाले.>मालगाडी घसरलीशुक्रवारी ओडिशातही एक मालगाडी घसरली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पारादीप-कटक मालगाडी गोरखनाथ आणि रघुनाथपूरदरम्यान सकाळी ५.५५ वाजता रुळावरून घसरली.
वास्को द गामा-पटना एक्स्प्रेस रुळावरून घसरली, अपघातात तीन जणांचा मृत्यू, 8 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 6:52 AM