ऑनलाइन लोकमत
जींद (हरियाणा), दि. 12 - मुसलमान आणि ख्रिश्चनांची वाढती लोकसंख्या हा हिंदूंसाठी धोक्याचा इशारा असून या दोन्ही समाजाच्या लोकांची नसबंदी करायला हवी असे वादग्रस्त विधान हिंदू महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष साध्वी देवा ठाकूर यांनी केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हिंदू महासभेच्या नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु आहे. यात आता साध्वी देवा ठाकूर यांची भर पडली आहे. हरियाणातील जिंद येथे पत्रकार परिषदेत साध्वी देवा ठाकूर यांनी बेजबाबदार विधान करत मोदी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. हिंदूंनी जास्त जास्त अपत्यांना जन्म द्यावा, त्यामुळे जगावर हिंदूंचा प्रभाव राहील असे आवाहन त्यांनी केले. मुसलमान व ख्रिश्चनांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करायला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. हरियाणात नथुराम गोडसे यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीचेही त्यांनी समर्थन केले. चर्च व मस्जिदमध्ये हिंदू देवी देवतांची मुर्ती लावावी असे बेताल वक्तव्यही त्यांनी केले.