शूज आणि चप्पल विकून कोणी करोडपती होऊ शकतं का? असं जर कोणी विचारलं तर ते सोपं नसल्याचं म्हटलं जाईल. पण एका तरुणाने हे शक्य करून दाखवलं आहे. सहसा शूज आणि चप्पल दुकानांमध्ये विकले जातात, परंतु या तरुण उद्योजकाने स्नीकर्सचं ऑनलाईन दुकान उघडलं. Flipkart, Amazon, Myntra आणि Zebong सारखं मेन स्ट्रीट ऑनलाइन मार्केटप्लेस सुरू केलं. अलिकडच्या काळात देशात स्नीकरचा ट्रेंड खूप वाढला आहे,
मेनस्ट्रीट मार्केटप्लेसचे फाउंडर वेदांत लांबा यांची सक्सेस स्टोरी तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. वेदांत लांबा यांनी 2017 मध्ये ‘मेन स्ट्रीट’ नावाचं YouTube चॅनल सुरू केलं, जे नंतर मेनस्ट्रीट मार्केटप्लेस नावाच्या स्टार्ट-अपमध्ये विकसित केलं गेलं. या ऑनलाइन मार्केटप्लेसवर 3,000 हून अधिक उत्पादने आहेत, ज्यात स्नीकर्सपासून ते विविध प्रकारचे टी-शर्ट आणि हुडीज आहेत.
ET च्या रिपोर्टनुसार, वेदांत लांबा म्हणाले की, त्यांच्या स्टार्टअपने आर्थिक वर्ष 22-23 मध्ये 24 कोटी रुपयांचा रेवेन्यू मिळवला. आता हा आकडा FY23-24 मध्ये 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. देशातील काही अब्जाधीश उद्योगपतींनी या स्टार्टअपमध्ये 2 मिलियन डॉलर गुंतवणूक केली आहे यावरून मेनस्ट्रीट मार्केटप्लेसच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. यामध्ये Zomato चे CEO दीपिंदर गोयल, Zerodha को-फाउंडर निखिल कामथ आणि बादशाह सारख्या रॅपर्सचा समावेश आहे.
रणबीर कपूर, करण जोहर, रणवीर सिंग यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटीही मेनस्ट्रीट मार्केटप्लेसचे ग्राहक असल्याचा दावा केला जात आहे. वेदांत लांबा यांनी त्यांच्या व्यावसायिक कौशल्याने स्टार्टअप पुढे नेले आणि त्यात प्रचंड यश मिळवले. हायस्कूलपर्यंत शिकल्यानंतर शिक्षण सोडल्याचं वेदांत यांनी सांगितलं होतं. 2005 ते 2010 दरम्यान सेंट मेरी स्कूल, पुणे येथे शिक्षण घेतलं. मेनस्ट्रीट मार्केटप्लेस हे एक मल्टी-ब्रँड रिसेलिंग प्लॅटफॉर्म आहे जो Nike, Adidas, Yeezy, Supreme आणि Druhouse यासह जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँडचे स्नीकर्स विकतो.