- संतोष ठाकूरनवी दिल्ली : देशातील २५ शहरांत केंद्र सरकारने लेन ड्रायव्हींगच्या नियमांची कठोरपणे अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने संबंधित शहरांशी चर्चेची तयारीही सुरू केली आहे. ज्या शहरांत ही योजना राबवली जाणार आहे त्यात दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, मुंबई, पुणे, नागपूर, नासिक, अहमदाबाद, सूरत आणि लुधियानाचा समावेश आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सगळ््या शहरांची यादी तयार नाही. केंद्रीय रस्ते संशोधन परिषद आणि इतर संस्थांकडून वाहतूक कोंडी आणि अपघातांची आकडेवारी मिळवली जात आहे. त्या आधारे पहिल्या टप्प्यातील शहरांची निवड केली जाईल नंतर दुसºया टप्प्यात इतर शहरांचा समावेश केला जाईल. पहिल्या टप्प्यात दिल्ली, पुणे आणि नागपूरबरोबर इतर काही शहरांत योजना सुरू केली जाईल.मुंबईबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हा अधिकारी म्हणाला की, मुंबईत मोठ्या प्रमाणावर लेन नियमाचे पालन केले जाते. परंतु, आम्ही या शहरातही काही ठिकाणी ही योजना राबवू इच्छितो.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडकरी यांनी याबाबत आढावा बैठकीत घेतली होती. आता लेन ड्रायव्हींगच्या नियमाबाबत जागृतीसोबत ज्या शहरांत प्रचंड संख्येने वाहने आहेत तेथे हा नियम राबवला जाईल. त्यात वाहन जप्तीसह मोठा आर्थिक दंडही ठोठावण्याचा विचार मंत्रालय करीत आहे.विलंबासही कारणीभूतलेन ड्रायव्हींगचा नियम न पाळल्यामुळे देशाच्या प्रमुख शहरांत इच्छित स्थळी पोहोचण्यास सरासरी दीड ते दोन तासांचा विलंब होतो. याशिवाय एकूण अपघातांत जवळपास सहा ते सात टक्के अपघातदेखील लेन नियमांचे पालन न केल्यामुळे होतात.
लेन मोडल्यास वाहन जप्त! २५ शहरांत होणार सक्ती; मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:53 PM