शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

मधुमेह असतानाही 71 वर्षांच्या व्यंकय्या नायडूंनी कशी जिंकली कोरोनाची लढाई? सांगितलं सिक्रेट!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 14, 2020 11:53 AM

व्यंकय्या नायडू यांना 29 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर सोमवारी 12 ऑक्टोबरला RT-PCR टेस्टनंतर त्यांनी स्वतःच आपला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. म्हणजे ते केवळ दोन आठवड्यांच्या आतच रिकव्हर झाले. (Vice President Venkaiah Naidu)

ठळक मुद्देकोरोनावर मात केल्यानंतर नायडू यांनी आपले अनुभव सांगत लोकांना वॉकिंग, जॉगिंग अथवा योग यांसारखा नियमित व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे.'डायटमध्ये  प्रथीनयुक्त पदार्थ खाणे आणि जंक फूड पूर्णपणे टाळणे हेही महत्वाचे - नायडूआपल्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेणे, मास्क लावणे, नेहमी-नेहमी हात धुणे, नेहमी स्वच्छतेची काळजी घेणे आदी प्रोटोकॉल्स कठोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे - नायडू

नवी दिल्ली - देशी खाद्य पदार्थ आणि फिजिकल फिटनेस मुळे उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) कोरोनातून लवकर बरे होऊ शकले. स्वतःला फिट आणि पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी ते काय करत होते, हे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. एवढेच नाही, तर फिजिकल फिटनेस, मेंटल एक्सरसाईज आणि खाण्यात देशी गोष्टींचा वापर केल्यास आपण या इंफेक्शनविरोधातील लढाई जिंकू, असा अपल्याला विश्वास होता, असे नायडू यांनी म्हटले आहे.

आपल्या पोस्टमध्ये व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे, 'मला विश्वास आहे, की माझे वय आणि मधुमेहासारख्या (Diabetes) काही व्यैद्यकीय समस्या असतानाही, मी फिजिकल फिटनेस, मानसिक तप, योग आणि वॉकिंग सारख्या रेग्युलर एक्सरसाईजमुळे कोविड-19ची लढाई जिंकू शकलो. या शिवाय मी केवळ देशी खाद्य पदार्थच घेत होतो. आपल्या सेल्फ आयसोलेशन काळात मी याच गोष्टी केल्या.'

कोरोनावर मात केल्यानंतर नायडू यांनी आपले अनुभव सांगत लोकांना वॉकिंग, जॉगिंग अथवा योग यांसारखा नियमित व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, 'डायटमध्ये  प्रथीनयुक्त पदार्थ खाणे आणि जंक फूड पूर्णपणे टाळणे हेही महत्वाचे आहे. याशिवाय, आपल्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेणे, मास्क लावणे, नेहमी-नेहमी हात धुणे, नेहमी स्वच्छतेची काळजी घेणे आदी प्रोटोकॉल्स कठोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे.'

होम क्वारनटीन काळातील आपल्या दिनचर्येसंदर्भात बोलताना ते म्हणाले, न्यूज पेपर, मॅगझीन आणि आर्टिकल वाचत असल्याने त्यांचा दिवस अत्यंत चांगला गेला. ते म्हणाले, 'या काळात मी स्वतंत्रता आंदोलनाच्या संदर्भातीलही अनेक गोष्टींचे अध्ययन केले. मी दर आठवड्याला दोन फेसबुक पोस्टदेखील लिहीत आहे. यात स्वातंत्र्य संग्रामातील काही अनोळखी शूरवीरांच्या बलिदानांचे आणि शौर्याचे किस्से आहेत.'

व्यंकय्या नायडू यांना 29 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर सोमवारी 12 ऑक्टोबरला RT-PCR टेस्टनंतर त्यांनी स्वतःच आपला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. म्हणजे ते केवळ दोन आठवड्यांच्या आतच रिकव्हर झाले आहेत. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी कोरोनातून रिकव्हरीसाठी प्रार्थना करणाऱ्यांचे, शुभचिंतकांचे, वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स यांचे आभारही मानले आहेत.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या