नवी दिल्लीः इंग्रजांनी आपल्या सोयीनुसार भारताचा इतिहास लिहिला आहे. 1857च्या क्रांतीलाही त्यांनी स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेला पहिला संघर्ष मानलेला नव्हता. त्यामुळे इतिहासाला भारतीय संदर्भ आणि मूल्यांच्या आधारे लिहिण्याची गरज आहे, असं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी म्हटलं आहे. ते दिल्लीतल्या तमीळ स्टुडंट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते.या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी इतिहासकारांना नव्या भारतीय संदर्भ आणि मूल्यांच्या आधारे इतिहास लिहिण्याचं आव्हान केलं आहे. ब्रिटिश इतिहासकारांनी 1857ला झालेल्या लढ्याला फक्त 'एक शिपायांचा' विद्रोह असं म्हटलं होतं. भारताचं शोषण हा इंग्रजांच्या हिताशी संबंधित विषय आहे. त्यासाठी त्यांनी इतिहासाची मोडतोड केली. देशाच्या शिक्षण प्रणालीतून भारतीय संस्कृती आणि परंपरेचं अनोखं दर्शन घडलं पाहिजे.आपल्या देशात 19 हजारांहून अधिक भाषा आणि मातृभाषा बोलल्या जातात. आपल्याला हा समृद्ध भाषेचा वारसा जपण्याची गरज आहे. भारत एक महान देश आहे. जिथे अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेचं ज्ञान शाळेत दिलं जातं. अशानं मुलांची शिकण्याची क्षमता वाढणार असून, भाषांनाही संरक्षण प्रधान केलं जाणार आहे.
"इतिहासाची इंग्रजांकडून मोडतोड, भारताच्या अनुषंगानं इतिहास लिहिण्याची गरज"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 10:59 AM