अमित शहांवर जहरी टीका; 'तो' शब्द वापरल्याने राहुल गांधींना न्यायालयाने बजावले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 03:20 PM2023-11-30T15:20:31+5:302023-11-30T15:20:55+5:30
याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून, पक्षाचे नेते भाजपवर पलटवार करत आहेत.
Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातीलन्यायालयाने समन्स बजावले आहे. 2018 मध्ये त्यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. काँग्रेस याला षडयंत्र म्हणत असून, ते या कटात यशस्वी होणार नाहीत, असे काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले.
भाजपचे माजी पदाधिकारी आणि व्यवसायाने वकील विजय मिश्रा यांनी त्यांच्या तक्रारीत राहुल गांधी यांच्या 2018 च्या विधानाबाबत गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी 2018 मध्ये बंगळुरुमध्ये गृहमंत्री अमित शहा यांना “खूनी” म्हटले होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी तक्रार करण्यात आली आहे. राहुल गांधींना किमान दोन वर्षांची शिक्षा व्हावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
#WATCH | On UP's Sultanpur court summon to Congress MP Rahul Gandhi over remarks on Union Home Minister Amit Shah, Rajasthan CM & Congress leader Ashok Gehlot says, "It will cost them (BJP) in 2024. The aura of PM Modi that was there earlier is no longer there. They are unable to… pic.twitter.com/QIPo1Xdhb2
— ANI (@ANI) November 30, 2023
यापूर्वी सुरत न्यायालयानेही अशाच एका प्रकरणात राहुल गांधींना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि त्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. मोदी आडनावाशी संबंधित या प्रकरणात राहुलविरोधात ही शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने राहुल गांधींना दिलासा मिळाला आणि त्यांचे सदस्यत्वही बहाल करण्यात आले. आता या नव्या प्रकरणावर काँग्रेस आक्रमक झाली आहे.
भाजपचे लोक षडयंत्र रचत आहेत - अशोक गेहलोत
काँग्रेस नेते माणिक टागोर यांनी याप्रकरणी भाजपवर निशाणा साधताना राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, मात्र आम्ही या झुकणार नाही, असे म्हटले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधींना समन्स पाठवल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, भाजपवाले सातत्याने कट रचत आहेत. हे लोक न्यायव्यवस्थेवरही दबाव आणतात. आता त्यांचा हा डाव 2024 मध्ये यशस्वी होणार नाही.