कोलकाता : ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल रशीद खान यांचे वृद्धापकाळातील आजारांमुळे गुरुवारी येथील एका खासगी इस्पितळात निधन झाले. ते १०७ वर्षांचे होते.सकाळी प्रकृती खालावल्याने उस्तादांना इस्पितळात हलविण्यात आले, पण तेथे त्यांचे निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव शुक्रवारी उत्तर प्रदेशात रायबरेली येथे नेण्यात येईल तीन वर्षांपूर्वी पद्मभूषण आणि त्याआधी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अब्दुल रशीद खान गेली २० वर्षे येथील आयटीसी संगीत अकादमीत संगिताचे निवासी गुरु होते. प्रकृती साथ देत नव्हती तरी त्यांचे अध्यापनाचे कार्य अव्याहतपणे सुरु होते. (वृत्तसंस्था)बुधवारीही त्यांनी अकादमीत नेहमीप्रमाणे वर्ग घेतला होता, असे त्यांच्या एका विद्यार्थ्याने सांगितले.उस्ताद अब्दुल रशीद खान यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्राने एक अनमोल रत्न गमावले, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ गायक अब्दुल रशीद खान यांचे निधन
By admin | Published: February 19, 2016 3:12 AM