Chalapathi Rao : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चलपती राव (Chalapathi Rao) वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयानुसार गेल्या काही दिवसांपासून अनेक आजारांशी ते झुंज देत होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विनोदी ते थेट खलनायकाची भुमिका उत्तमपणे साकारणारे चलपती राव तेलुगू सिनेमातील महत्वाचा चेहरा होते. त्यांचे विनोदाचे टायमिंग तर जबरदस्तच होते. त्यांनी जवळपास ६०० चित्रपटांत काम केले आहे. रवी तेजा, एनटी रामराव, कृष्णा, अक्किनेनी नागार्जुन, चिरंजीवी आणि व्येंकटेश अशा अनेक सुपरस्टार सोबत काम केले आहे.तर बॉलिवुडमध्येही त्यांनी सलमान खानच्या किक (Kick) मध्ये काम केले होते. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे.
चलपती राव हे आंध्र प्रदेशच्या बालिपरु मध्ये वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा रवि बाबू देखील एक अभिनेता आहे. राव यांनी साक्षी(Sakshi), ड्राइ्व्हर रामुडू, वज्रम (Vajram), वीरा (Veera) सारख्या हिट चित्रपटात काम केले आहे. त्यांची मुलगी ही अमेरिकेहून परतणार असल्याने चलपती राव यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दोनच दिवसांपूर्वी तेलगु सिनेमातील दिग्गज अभिनेते कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) यांनी जगाचा निरोप घेतला. हैदराबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज चलपती राव यांच्या निधनाने तेलगु चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.