शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! सभागृहात शिवीगाळ करणे भोवले; अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित
2
BREAKING : टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा! BCCI ने अचानक संघ बदलला; तिघांना वगळलं नव्या चेहऱ्यांना संधी
3
भाषणातून हटवलेले शब्द पाहून राहुल गांधी संतापले; सभापतींना पत्र लिहून सांगितले नियम
4
तो चेंडू रोहितकडे फेकणार होतो, पण...; त्या झेलवरील वादावर सूर्याचा मोठा गौप्यस्फोट
5
काँग्रेसवर हल्लाबोल, खासदारांना कानमंत्र..., NDA च्या बैठकीत PM नरेंद्र मोदी काय म्हणाले?
6
‘होई वही जो राम रचि राखा’, अयोध्येतील पराभवावरून अखिलेश यादवांचा भाजपा टोला
7
नेपाळच्याही संघात बाबर आझमला संधी मिळणार नाही; शोएब मलिकची सडकून टीका
8
HDFCच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी UPI चालणार नाही, बॅलन्ससह 'या' सेवाही वापरता येणार नाहीत
9
"मनोज जरांगे-पाटील यांच्या घराची कोण टेहळणी करतंय? त्यांना संरक्षण द्या’’, विजय वडेट्टीवार यांची मागणी 
10
Ramdas Athawale : "राहुल गांधी हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत, काँग्रेसच दहशतवादी"; रामदास आठवलेंचा आरोप
11
"तेव्हा मी रात्रभर ढसढसा रडत होतो..."; गौतम गंभीरने सांगितला 'टीम इंडिया'बद्दलचा किस्सा 
12
Video - "तुम्हाला पगार कोण देतं?, तुझी सकाळ झाली नाही का?"; पोलिसावर संतापली मंत्र्याची पत्नी
13
प्रेरणादायी! 'मोटरस्पोर्ट्स'साठी टेनिसपटूचं 'धाडस', तरूणाईसाठी उभारलं हक्काचं व्यासपीठ
14
विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपाचे ३ नेते शर्यतीत; कोण मारणार बाजी?
15
चंद्र-मंगळ युती: ६ राशींवर महालक्ष्मीची असीम कृपा, परदेशी वारीचा योग, पद-प्रतिष्ठा वाढेल!
16
अजित पवारांचा विश्वासू शिलेदार साथ सोडणार?; विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार
17
Indian Temple: भारतातील 'ही' अद्भुत मंदिरं पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल हे नक्की!
18
चक्रीवादळ: बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया भारतात कधी येणार? मोठी अपडेट आली...
19
Whiskey तयार करणाऱ्या कंपनीचं शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग, पाहा पहिल्याच दिवशी किती झाला फायदा?
20
India Vs Zimbabwe T20i Series 2024: टीम इंडिया नव्या परीक्षेसाठी झिम्बाब्वेला रवाना! शुबमन गिल संघाचा कॅप्टन, द्रविडच्या जागी कोण?

'जय पॅलेस्टाईन'मुळे मोठा वाद; VHP-बजरंग दलची असदुद्दीन ओवेसींविरोधात जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 3:06 PM

VHP-Bajrang Dal Protest: असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेताना 'जय पॅलेस्टाईन' असा नारा दिला होता.

Asaduddin Owaisi News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यादरम्यान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'जय पॅलेस्टाईन'ची घोषणा दिली होती. त्यांच्या या घोषणेमुळे बराच वाद निर्माण झाला. दरम्यान, आज(दि.30) विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाने त्यांच्याविरोधात दिल्लीत जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली. 

बिघडलेली परिस्थिती पाहून दिल्ली पोलिसांनी आधीच बॅरिकेड लावले होते. मात्र, विहिंप आणि बजरंग दलाचे सदस्य बॅरिकेडिंगवर चढून घोषणाबाजी करताना दिसले. त्यांच्या हातात ओवेसींचा आक्षेपार्ह फोटोही होता. आंदोलनात सहभागी झालेल्यांनी 'संसदेची प्रतिष्ठा भंग करणारे असे खासदार नकोत,' अशा आशयाचे फलक हातात घेतले होते.

शपथविधीदरम्यान जय पॅलेस्टाईनचा नारामंगळवारी (25 जून) लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेताना असदुद्दीन ओवेसी यांनी जय पॅलेस्टाईनचा नारा देत वाद निर्माण केला. उर्दूमध्ये शपथ घेतल्यानंतर त्यांनी शेवटी 'जय भीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन'चा नारा दिला. यानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी काही मिनिटे संसदेत गदारोळ केला. या नाऱ्याची परिणाम संसदेच्या बाहेरदेखील उमटत आहेत.

ओवेसी काय म्हणाले?ओवेसी यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, "सत्ताधारी पक्षाला जे करायचे ते करू द्या. मलाही संविधानाची थोडीफार माहिती आहे. या पोकळ धमक्या माझ्यावर चालणार नाहीत. प्रत्येकजण खूप काही बोलत होते. मी फक्त जय भीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन म्हणालो. हे कसे संविधानाच्या विरोधात नाही," असे ओवेसी म्हणाले.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनParliamentसंसद