Vice President Jagdeep Dhankhar: “परदेशात जाऊन भारतावर टीका करणे चुकीचे”; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर उपराष्ट्रपती भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 01:03 PM2023-03-10T13:03:28+5:302023-03-10T13:05:08+5:30

Vice President Jagdeep Dhankhar: केंब्रिजमध्ये केलेल्या भाषणावरून उपराष्ट्रपतींनी राहुल गांधींवर टीका केली.

vice president jagdeep dhankhar replied congress leader rahul gandhi criticism on india in abroad | Vice President Jagdeep Dhankhar: “परदेशात जाऊन भारतावर टीका करणे चुकीचे”; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर उपराष्ट्रपती भडकले

Vice President Jagdeep Dhankhar: “परदेशात जाऊन भारतावर टीका करणे चुकीचे”; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर उपराष्ट्रपती भडकले

googlenewsNext

Vice President Jagdeep Dhankhar: काँग्रसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक विशिष्ट अजेंडा चालवत आहेत आणि त्याकडे देशाला घेऊन जात आहेत असा आरोप केला होता. यावरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. यातच आता देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कर्ण सिंह मुंडक यांच्या उपनिषदावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन केले. त्या कार्यक्रमात राहुल गांधी यांचे नाव न घेता उपराष्ट्रपतींनी टीका केली. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती म्हणाले की भारताच्या लोकसभेत माईक बंद केला जातो हे इथल्या खासदारने विदेशात जाऊन म्हणणे हा देशाचा अपमान आहे, असेही उपराष्ट्रपती धनखड यांनी म्हटले आहे.

...तर ते कदापि सहन केले जाणार नाही   

परदेशात जाऊन आपल्या देशावर टीका करणे हे साफ चुकीचे आहे. तसेच भारताच्या संसदेत माईक बंद केला जातो हे राहुल गांधी यांचे म्हणणे गैर आहे. भारताकडे G20 चे अध्यक्षपद आहे. भारतासाठी हा गौरवशाली क्षण आहे. अशावेळी एक खासदार परदेशात जाऊन भारतावर टीका करत असेल, देशाचा अपमान करत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही. सध्या आपला देश अमृत काळात आहे. सगळे भारतीय आनंदात आहेत. आपण अशा काळात असताना देशातील खासदार देशाच्या विरोधात बोलतो तेही बाहेरच्या देशात जाऊन. हे कितीतरी दुःखद आणि दुर्दैवी आहे. समृद्ध लोकशाही मूल्यांचे हे हनन आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.  उपराष्ट्रपतींनी राहुल गांधींचे नाव घेतले नाही मात्र त्यांचा रोख राहुल गांधींकडेच होता, असे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: vice president jagdeep dhankhar replied congress leader rahul gandhi criticism on india in abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.