शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

उपराष्ट्रपतींकडून बरेचकाही शिकलो - मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:07 AM

माझ्या प्रत्येक परदेश दौऱ्याआधी व नंतर उपराष्ट्रपतींकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. दहा वर्षांच्या कारकिर्दीत अन्सारींनी सर्वांना सांभाळले. संसदीय इतिहासातही मोलाची भर घातली.

 नवी दिल्ली : माझ्या प्रत्येक परदेश दौऱ्याआधी व नंतर उपराष्ट्रपतींकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. दहा वर्षांच्या कारकिर्दीत अन्सारींनी सर्वांना सांभाळले. संसदीय इतिहासातही मोलाची भर घातली. अन्सारी अशा कुटुंबाचे प्रतिनिधी आहेत की ज्याने देशाच्या इतिहासात खिलाफत चळवळीपासून अनेक बाबतींत मोठे योगदान दिले आहे. उपराष्ट्रपतीपदावरून निवृत्त होताना आपले स्वास्थ्य उत्तम आहे. यापुढे आपण बहुधा नव्या क्षेत्राच्या दिशेने प्रयाण करणार आहात. आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहून चांगले काम करावे, यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत काढले.राज्यसभेत गुरुवारी सदस्यांनी उपराष्ट्रपती अन्सारींना भावपूर्ण निरोप दिला. सभागृह नेते अरुण जेटली, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, डॉ. करण सिंग, तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, राष्ट्रवादीचे माजिद मेमन, शिवसेनेचे संजय राऊत, जद(यु)चे अली अनवर अन्सारी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव या नेत्यांनी अन्सारींच्या कामकाज पद्धतीचा, वेळोवेळी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा व नि:पक्षपातीपणाचा उल्लेख करीत गौरवपूर्ण भाषणे केली.