नवी दिल्ली : ‘लोकमत’च्या वतीने राज्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘विश्वकर्मा- द ड्रिम बिल्डर्स (महाराष्ट्र अॅँड गोवा) या कॉफीटेबल बुकचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कौतुक केले. त्याचबरोबर प्लॅस्टिकमुक्ती आणि कचरा निर्मूलनासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत प्रोजेक्ट पिशवी’ या उपक्रमाची प्रशंसा केली.लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे व्यंकय्या नायडू यांना ‘विश्वकर्मा ’ कॉफीटेबल बुक आणि प्रोजेक्ट पिशवी भेट दिली. या वेळी लोकमतचे नॅशनल पॉलिटिकल एडिटर हरिश गुप्ता उपस्थित होते. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन झाले होते. देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या बांधकाम व्यावसायिकांचा कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून गौरव केल्याबद्दल नायडू यांनी समाधान व्यक्त केले.प्लॅस्टिकमुक्ती आणि कचरानिर्मूलनासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट पिशवी’ मोहीमेचेही नायडू यांनी कौतुक केले. पर्यावरण संरक्षणासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेली ‘प्रोजेक्ट पिशवी’ ही मोहीम देशव्यापी बनावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
‘लोकमत’च्या ‘विश्वकर्मा’चे उपराष्ट्रपतींकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:35 AM