चेन्नई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यावरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या विधानावरून खळबळ उड्ण्याची शक्यता आहे. भारतात काही लोकांना हिंदू शब्दाची अॅलर्जी आहे, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. एखाद्या खास धर्माचा अपमान किंवा समाधान करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता होत नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेशात धार्मिक छळाला सामोरे जावे लागले, अशा अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी आहे, असेही एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
चेन्नईमध्ये श्री रामकृष्ण मठाद्वारे प्रकाशित तमीळ मासिक श्री रामकृष्ण विजयमच्या शताब्दी समारोह आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एम. व्यंकय्या नायडू बोलत होते. भारतात काही लोकांना हिंदू शब्दाची अॅलर्जी आहे. जरी हे योग्य नसले, तरीही त्यांना असा दृष्कीकोण बाळगण्याचा अधिकार आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे दुसऱ्या धर्मांचा अपमान नाही आहे, तर धर्मनिरपेक्ष संस्कृती भारतीय लोकाचारचा एक भाग आहे, असे एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
एम. व्यंकय्या नायडू म्हणाले, "देशाने नेहमीच पीडित लोकांना आश्रय दिला आहे. स्वामी विवेकानंद एक सामाजिक सुधारक होते आणि त्यांनी पश्चिमेत हिंदुत्वापासून परिचय केला. स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते की, विविध देशातील पीडित लोकांना आणि शरणार्थींना आश्रय दिला आहे, त्या देशातून मी आलो आहे." याचबरोबर, भारत आता पीडित लोकांना आश्रय देण्यासाठी तयार आहे. मात्र, काही तत्वे यासंदर्भात वाद-विवाद करत आहेत, असेही व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
(रस्त्यांवर हिंसा केल्याने समस्या सुटणार नाहीत : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू)(विरोध झाला तरी नागरिकत्व कायदा राबवूच; अमित शहांनी ठणकावले)('विरोधकांकडून युवकांची दिशाभूल सुरू; ईशान्येतील संस्कृती नष्ट होणार नाही')