ऑनलाइन लोकमत
बारां, (राजस्थान), दि. 26 - नोटाबंदीविरोधात सराकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी या मुदद्यावरून केंद्र सरकारला पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला. राजस्थान येथील बारां येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या यज्ञात मोदींनी शेतकऱ्यांचा बळी दिला, असा सनसनाटी आरोप केला. नोटाबंदीचा निर्णय हा गरीब, शेतकरी आणि मजुरांच्याविरोधात घेण्यात आला होता. 99 रोख रक्कम जी भारतीयांजवळ आहे ती काळा पैसा नसल्याचेही राहुल गांधी म्हणात.
स्विस सरकारकडून सरकारला स्वीस बँकेतील खातेधारकांची नावे मिळाली होती. मोदींनी अद्याप ती जाहीर केली नाहीत. ती कधी करणार. सध्या पेटीएमवरून ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगण्यात येत आहे. पण पेटीएम म्हणजे मोदींना पैसे द्या, असाच त्याचा अर्थ होतो. 99 टक्के रोख रक्कम जी देशवासियांकडे आहे ती काळा पैसा नाही. तसेच शेतकऱ्यांकडे मोदी सरकार आणि वसुंधरा सरकारचे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
Paytm means Pay to Modi. Modiji said we'll bring back black money & distribute that money among poor,later he changed his narrative: RGandhi— ANI (@ANI_news) 26 December 2016
Modiji aapke is notebandi ke yagya mei Hindustan aur Rajasthan ke kisaan ki bali chadhi hai; aapne unka cash jala diya: Rahul Gandhi pic.twitter.com/Xnm9b30tFt— ANI (@ANI_news) 26 December 2016