शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विजयाने विरोधकांना बळ, भाजपाच्या पराभवासाठी आघाडी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 4:35 AM

गोरखपूर, फुलपूर, अरारिया, जेहानाबाद येथील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याने विरोधी पक्षांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अखिलेश यादव, मायावती, तेजस्वी यादव, मिसा भारती, ममता बॅनर्जी, दोन्ही डावे पक्ष तसेच काँग्रेसचे नेते यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना पुन्हा व्यक्त केली आहे.

शीलेश शर्मानवी दिल्ली : गोरखपूर, फुलपूर, अरारिया, जेहानाबाद येथील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याने विरोधी पक्षांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अखिलेश यादव, मायावती, तेजस्वी यादव, मिसा भारती, ममता बॅनर्जी, दोन्ही डावे पक्ष तसेच काँग्रेसचे नेते यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना पुन्हा व्यक्त केली आहे.बुधवारी निकाल लागण्याच्या चोवीस तास आधी सोनिया गांधी यांच्या घरी आयोजिलेल्या मेजवानीत १९ पक्ष सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये बसपा व सपा एकत्र आल्यानंतर लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये जे निकाल लागले ते पाहता सारे विरोधक एकत्र आल्यास मोदी सरकारचा विजयरथ रोखता येईल, असा आत्मविश्वास त्यांच्यात आला आहे.फुलपूर व गोरखपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकांत काँग्रेस पराभूत झाली असली तरी या पराजयातही काँग्रेसचा एकप्रकारे विजयच झाला आहे. या दोन्ही मतदारसंघात सपा-बसपाच्या आघाडीच्या उमेदवारांविरोधात काँग्रेसने आपले उमेदवार विचारपूर्वक मैदानात उतरविले होते. भाजपा उमेदवाराची मते काँग्रेसच्या उमेदवाराने काही प्रमाणात घेतल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा सपा-बसपाला मिळाला.केंद्रात सत्तेत असलेला पक्ष पोटनिवडणुकांत शक्यतो जिंकतो. पण २०१६-१७ या काळातील पोटनिवडणुकांत भाजपा पराभूतच होत आला आहे. अमृतसर, श्रीनगर, गुरुदासपूर, अजमेर, अलवर, फुलपूर, गोरखपूर, अरारिया येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल हेच सांगतात. सपा व बसपाचा २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत सणसणीत पराभव झाला होता. पण फुलपूर, गोरखपूर पोटनिवडणुकांच्या निकालांनी विरोधी पक्षांमध्ये नवे बळ संचारले आहे.>भाजपाने लोकसभेतील स्पष्ट बहुमत गमावलेलोकसभेच्या पोटनिवडणुकीत उत्तरप्रदेशातील दोन आणि बिहारमधील एक अशा तीन जागांवर पराभव झाल्याने सत्ताधारी भाजपने आपले स्पष्ट बहुमत गमावले आहे, असा दावा काँग्रसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केला आहे.रणदीपसिंह सुरजेवाला यांनी टविटमध्ये म्हटले आहे की, २०१७-१८ मध्ये लोकसभेच्या सर्व १० पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाला. २०१४ मध्ये भाजपला एकूण २८२ जागी विजय मिळाला होता. मागील चार वर्षात भाजपचे संख्याबळ घसरून २७१ वर पोहचले आहे. शिवाय भाजपने खासदार किर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित केले आहे तर खासदार शत्रुध्न सिन्हा यांच्याशी भाजपाने संबंध पूर्णपणे तोडले आहेत.>काँग्रेसही आघाडीसाठी तयारउत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी अहंकार बाजूला ठेवून बसपाशी युती करण्याची तयारी दर्शविली. भाजपाला हरविण्यासाठी बसपासोबत जाण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले होते. अखिलेशने अखेर मायावती यांना समझोत्यासाठी राजी केले. या उदाहरणाकडे पाहून मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी विविध राज्यांमध्ये काही वेळेस इच्छा नसतानाही अन्य पक्षांबरोबर आघाडी करण्याची तयारी काँग्रेसनेही केली आहे. त्यासाठी काही ठिकाणी लहान भावाची भूमिका काँग्रेसला स्वीकारावी लागेल.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावती