विदर्भात तापमानात घट
By admin | Published: January 31, 2017 2:06 AM
पुणे : विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे़ त्याच वेळी कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान मालेगाव येथे १०़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
पुणे : विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे़ त्याच वेळी कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान मालेगाव येथे १०़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ देशात आसाम, मेघालय, ओडिशा, मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड येथे सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे़ पश्चिम बंगाल, गुजरात, तेलंगणा येथे किमान तापमानात किंचित घट झाली आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)---------------चौकटराज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ११़७, जळगाव १२, कोल्हापूर १७़८, महाबळेश्वर १५़२, मालेगाव १०़६, नाशिक ११, सांगली १६़५, सातारा १५़५, सोलापूर १७़१, मुंबई २१़८, अलिबाग १९़७, रत्नागिरी २२़१, पणजी २४, डहाणू १७़८, औरंगाबाद १२़३, परभणी १३़२, बीड १३़८, अकोला १२़८, अमरावती १६, बुलढाणा १३, ब्रम्हपूरी १३़५, चंद्रपूर १४़२, गोंदिया १२़२, नागपूर ११़५, वाशिम १७, वर्धा १२़४, यवतमाळ १४़