लखनौ - उत्तर प्रदेशात पोलिसांनी ऑन कॅमेरा दोन जणांचा एन्काऊंटर केला आहे. अलिगड जिल्ह्यात गुरुवारी (20 सप्टेंबर) सकाळी हा एन्काऊंटर करण्यात आला. विशेष म्हणजे मीडियाला बोलावून पोलिसांना हा एन्काऊंटर केला. एवढंच नाही तर एन्काऊंटर कॅमेऱ्यात शूट करण्याची परवानगीही पोलिसांकडून मीडियाला देण्यात आली. एन्काऊंटर करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर 6 जणांच्या हत्येचा आरोप होता. दोन साधूंच्या हत्येतही आरोपींचा समावेश होता, अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. एन्काऊंटर केलेल्या आरोपींचे नाव नौशाद आणि मुस्तकीम अशी आहेत.
अलीगढचे पोलीस अधीक्षक अजय साहनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''दोघेही जण गुरुवारी बाईकवरुन जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर ते एका सरकारी इमारतीत जाऊन लपले व गोळीबार करू लागले. हल्ल्याला प्रत्युत्तर देत असताना चकमकीत त्यांचा मृत्यू झाला. यादरम्यान, एक पोलीस अधिकारीदेखील जखमी झाला''.