शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात पंजाबमध्ये आंदोलकांनी अभिनेत्री कंगना रणौतची गाडी रोखत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच या वक्तव्यांसाठी तिने माफीची मागणी केली. यानंतर कंगनाने आपल्या इंस्टाग्रामवर काही व्हिडीओ शेअर करत आंदोलकांवर शिवीगाळ केल्याचा आणि हल्ला करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. कंगनाने अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र काही वेळाने कंगना फेसबुकवर व्हिडीओ टाकून आज पंजाबमध्ये माझ्या गाडीला घेराव घालणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांशी मी बोलले . माझ्या टिप्पण्यांबद्दलचा गैरसमज दूर झाल्यानंतर मला शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची पोस्ट तिने केली आहे.
माझं विमान रद्द झाल्याने मी आताच हिमाचल प्रदेशमधून निघाले आहे. पंजाबमध्ये येताच जमावाने मला घेरलं आहे. ते स्वतःला शेतकरी असल्याचं सांगत असून ते माझ्यावर हल्ला करत आहेत आणि वाईट शिवीगाळ करत आहेत. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील देत आहेत. या देशात मॉब लिचिंग सुरू आहे. माझ्यासोबत सुरक्षा रक्षक नसते तर येथे कशी परिस्थिती असती? येथील परिस्थिती अविश्वसनीय आहे.” असं कंगना राणौत म्हणाली. मात्र, काही वेळाने कंगनाची वक्तव्यांबद्दल गैरसमज दूर झाल्यानंतर आंदोलकांनी कंगनाला आनंदाने शुभेच्छा देत जाऊ दिले.