ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 28 - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या निधनानंतर बुधवारी पहिल्यांदा चेन्नईतील अण्णाद्रमुकच्या कार्यालयात सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. उद्या पक्षाची सर्वसाधारण सभा होणार आहे. मात्र त्याआधी पक्षमुख्यालयात जोरदार हाणामारी झाली.
अण्णाद्रमुककडून राज्यसभेवर नियुक्त झालेल्या खासदार शशिकला पुष्पा यांना पक्षात सरचिटणीसपद हवे आहे. या पदासाठी शशिकला यांचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे पती लिंगेश्वर थिलागन, वकिल आणि समर्थकांसह पक्ष मुख्यालयात आले होते. यावेळी अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी लिंगेश्वर, वकिल आणि समर्थकांना बेदम मारहाण केली.
उद्या होणा-या पक्षाच्या बैठकीत जयललिता यांच्या अत्यंत विश्वासू शशिकला नटराजन यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड होणार आहे. शशिकला अखेरपर्यंत जयललिता यांच्यासोबत होत्या. अण्णाद्रमुकमधील पदाधिकारी आणि मंत्र्यांनी शशिकला नटराजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. आता फक्त औपचारीकता बाकी उरली आहे.
#WATCH: Suspended AIADMK MP Sasikala Pushpa's lawyer attacked outside party office by AIADMK workers in Chennai. pic.twitter.com/u10t63TmzX— ANI (@ANI_news) 28 December 2016