Amit Shah Take Dip Maha Kumbh Mela: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी सहकुटुंब प्रयागराजला पोहोचले. अमित शाह यांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संत, महंतही हजर होते. त्यानंतर शाह यांनी नातवाला संत, महंतांसमोर आणले. त्यावेळी महंतांनी शाहांच्या नातवाच्या अंगावर सावली धरत आशीर्वाद दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी मंत्रोच्चारात अमृत स्नान केले. यावेळी त्रिवेणी संगमावर अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी आणि बाबा रामदेव हेही होते.
जय शाह यांच्या मुलाला संतांनी दिले आशीर्वाद
अमित शाह यांच्यासोबत त्यांचे सुपूत्र आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह हेही होते. जय शाह त्यांच्या बाळाला घेऊन आले. अमित शाह यांनी नातवाला जवळ घेतले. त्यानंतर संतांनी आणि महंतांनी बाळाला आशीर्वाद दिले. उन्हाचा झळा लागत असल्याने महंतांनी बाळावर सावलीही धरली.
व्हिडीओ पहा
जवळपास १० मिनिटं पवित्र स्नान केल्यानंतर
पवित्र स्नानानंतर शाह यांनी संगमावर सहकुटुंब पूजा केली. त्यानंतर ते अक्षयवट येथे गेले. तिथे आघाड्यातील संतांसोबत त्यांची बैठक पार पडली. संत-महंतांसोबत त्यांनी जेवण केलं. महाकुंभमेळ्यात ५ तास घालवण्यानंतर अमित शाह पुन्हा पुढील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.