Helicopter Crash: उत्तराखंडमधील गरुडछत्तीनंतर आता अरुणाचल प्रदेशातून हेलिकॉप्टर अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. अरुणाचलच्या सियांग जिल्ह्यात लष्करी हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टर अपघाताची तीन दिवसातील दुसरी घटना आहे. गरुडछत्तीमध्ये झालेल्या अपघातात पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात आले आहे.
बचाव कार्य सुरूसियांग जिल्ह्यातील सिंगिंगजवळ 'एचएएल रुद्र' हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये पाच जण होते. ज्यामध्ये दोन पायलट आणि अन्य तीन जण होते. तुटिंग मुख्यालयापासून सुमारे 25 किमी अंतरावर हा अपघात झाला.
चीनच्या सीमेजवळ झाला अपघातगुवाहाटीच्या संरक्षण जनसंपर्क अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिथे या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, ती जागा चीनच्या सीमेपासून अवघ्या 35 किमी अंतरावर आहे. अप्पर सियांगचे पोलीस अधीक्षक जुम्मर बसर यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण रस्त्याने जोडलेले नाही. बचाव आणि मदत कार्यात काही अडचण येऊ शकते.
5 ऑक्टोबरलाही हा अपघात झाला होताअरुणाचल प्रदेशात हेलिकॉप्टर अपघाताची ही पहिली घटना नाही. या महिन्यात 5 ऑक्टोबर रोजी तवांग भागात उड्डाण करत असताना लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. हा भाग चीन सीमेजवळ आहे. या घटनेत हेलिकॉप्टरचा पायलट ठार झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पायलटचे नाव लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव असे आहे. या हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण समोर आलेले नाही.
हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनांमध्ये वाढगेल्या काही वर्षांत अरुणाचल प्रदेशात हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2010 पासून अरुणाचल प्रदेशात सुमारे 6 हेलिकॉप्टर अपघातात 40 जणांचा मृत्यू झाल्याचे एका अहवालात म्हटले आहे.