Gulmarg Avalanche : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथे असलेल्या लोकप्रिय स्की रिसॉर्टमध्ये बुधवारी(दि.1) हिमस्खलनामुळे मोठा अपघात घडला. या घटनेत दोन परदेशी नागरिक ठार झाले तर अनेक भारतीय अडकले आहेत. गुलमर्गच्या अफ्रावत भागात ही घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
बारामुल्ला जिल्हा पोलिसांच्या प्रवक्त्याने एका ट्विटमध्ये सांगितले की, “गुलमर्गमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट हापथखुद अफ्रावत शिखरावर हिमस्खलन झाले. बारामुल्ला पोलिसांनी इतर यंत्रणांसह बचावकार्य सुरू केले आहे. काही लोक अडकल्याची भीती आहे.
या घटनेत दोन परदेशी नागरिक (स्कीअर) आणि दोन 'गाईड' बेपत्ता झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली होती. मात्र, आता दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. विशेष म्हणजे, गुलमर्गचा आफ्रावत क्षेत्र हा एक वादग्रस्त हिमालयीन प्रदेश आहे, ज्यावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा दावा आहे.