Video: 'करन-अर्जुन आए न आएं, पर आएगा तो मोदी ही' भाजपाचं नवं रॅप साँग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 04:14 PM2019-04-20T16:14:51+5:302019-04-20T16:16:10+5:30
चौकीदार रॅप माध्यमातून भारतीय जनता पार्टीने एक रॅप साँग प्रसिद्ध केलं आहे. या गाण्याचे लेखन विनय दवे यांनी केलं आहे.
नवी दिल्ली - सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण रंगू लागलेलं असताना त्यात अनेक राजकीय पक्ष हटके प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. चौकीदार रॅप माध्यमातून भारतीय जनता पार्टीने एक रॅप साँग प्रसिद्ध केलं आहे. या गाण्याचे लेखन विनय दवे यांनी केलं आहे.
चौकीदार चोर हे या अभियानाला प्रतिउत्तर देताना मै भी चौकीदार हे अभियान भाजपाकडून छेडण्यात आलं. पंतप्रधानांपासून भाजपाच्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच जण चौकीदार बनले. या गाण्याच्या माध्यमातून भाजपाकडून विरोधकांना चिमटा काढण्यात आला आहे. मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुला, कन्हैयाकुमार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर या गाण्यातून निशाणा साधण्यात आला आहे. तुम्ही कितीही एकत्र आलात, पृथ्वीवर प्रलय आला, दिवस रात्र एक झाला तरी येणार तर मोदीच असा टोला विरोधकांना लगावला आहे.
करन-अर्जुन आए न आएं, पर आएगा तो मोदी ही। #IndiaWantsModiAgainpic.twitter.com/mncvpga6F6
— BJP (@BJP4India) April 20, 2019
राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरुन नरेंद्र मोदींना टार्गेट केलं असताना पप्पू नावाने राहुल गांधी यांची खिल्ली गाण्यातून उडविण्यात आली आहे. तुम्हीही किती ओरडा, राफेलचं खोटे बाहेर काढा, तुम्ही कितीही ओरडा येणार तर मोदीच असं गाण्यात सांगण्यात आलं आहे. ममता बॅनर्जी, लालू यादव, मायावती, अखिलेश यादव यांचा उल्लेख करत तुम्ही जातीजातीत कितीही भांडणे लावा तरी मोदीच येणार असा चिमटा काढण्यात आला आहे. भारतीय टीम ट्रॉफी घेऊन येवो ना येवो, आकाश पाताळ एक झालं तरी मोदीच येणार याप्रकारे गाणं लिहिण्यात आलं आहे.
चौकीदार चोर है ही काँग्रेसची मोहीम भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागल्याने भारतीय जनता पार्टीनेही मै भी चौकीदार ही मोहीम हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मै भी चौकीदार या मोहीमेतंर्गत ट्विटवर नरेंद्र मोदी नावाच्या पुढे चौकीदार नरेंद्र मोदी असा उल्लेख केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री, भाजपा पदाधिकारी यांच्यासोबत अनेकांना सोशल मिडीयात आपल्या नावापुढे बदल करत चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी आपली नावं बदलली. इतकचं नाही तर मै भी चौकीदार या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद कार्यक्रम हाती घेत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मै भी चौकीदार माध्यमातून चर्चा केली.