शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

Video : भाजपा मंत्र्याची निवडणूक अधिकाऱ्याशी हुज्जत, हेलिकॉप्टर तपासूच दिलं नाही    

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 10:21 AM

मंगळवारी ओडिशातील संबलपूर येथे पोहोचल्यानंतर प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाचे भरारी पथक घटनास्थळावर दाखल झाले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेलिकॉप्टर तपासल्याप्रकरणी आयएएस अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर, आता पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेणाऱ्या अधिकाऱ्यास प्रधान यांनी अर्वाच्य भाषेत दटावले. धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यास आलेल्या पथकातील पोलीस आणि अधिकाऱ्यांशी ते वाद घालतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

मंगळवारी ओडिशातील संबलपूर येथे पोहोचल्यानंतर प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाचे भरारी पथक घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी, प्रधान यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे मागितली. तसेच या पथकातील अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. विशेष म्हणजे, प्रधान यांच्या अशा वागण्यामुळे अधिकारी हेलिकॉप्टर न तपासताच परत फिरले. अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी केली, नसल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलचे प्रमुख नवीन पटनाईक यांच्याही हेलिकॉप्टरवर भरारी पथकाने धाड टाकली आहे. त्यामध्ये पटनाईक यांनी भररी पथकाला संपूर्ण सहकार्य करत, हेलिकॉप्टरची तपासणी करू दिली. राऊरकेला येथे पटनाईक येथील निवडणूक रॅलीदरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली होती. 

दरम्यान, ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले. मोहम्मद मोहसिन असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी संबलपूर लोकसभा मतदारसंघात मोदी सभेसाठी आले असताना मंगळवारी त्यांच्या हेलिकॉप्टरमधील साहित्याची तपासणी केली होती. 

टॅग्स :OdishaओदिशाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाministerमंत्रीElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग