नवी दिल्ली - दिल्लीतीलभाजपा आणि आम आदमी पार्टीमधीस संघर्ष टोकाला पोहोचला असून आज भाजपा कार्यकर्त्यांनी आपचे आमदार आणि दिल्लीतील जल बोर्डाचे उपाध्यक्ष राघव चंढ्ढा यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. यासंदर्भात राघव चंद्रा यांनी व्हिडिओ पोस्ट करुन माहिती दिली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली असून माझ्या अनेक सहकाऱ्यांना मारहण केली आहे. त्यामुळे, अनेक सहकारी घाबरले आहेत, असं ट्विट चंद्रा यांनी केलंय. भाजपा समर्थकांना पोलीस अडविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयात प्रवेश केला.
भाजपाचे नेते आणि गुंड दिल्ली जल बोर्डाच्या मुख्य कार्यालयावर आले होते, त्यावेळी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. तसेच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटोही भिंतीवरुन खाली काढून फाडण्यात आला. या घटनेनं येथील कर्मचारी आणि महिला वर्ग घाबरुन गेले आहेत. तसेच, माझ्या नावाचा उल्लेख करत, राघव चढ्ढा तुमचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समजावून सांग, शेतकऱ्यांचं लई हित बघतोय का, शेतकऱ्यांची बाजू घ्यायचा बंद करा, अन्यथा एकएक करत आम आदमी पक्षाच्या सर्वच उमेदवारांना आम्ही असाच धडा शिकवू, असे या तोडफोड केलेल्या भाजपा समर्थकांनी म्हटल्याचं आमदार चढ्ढा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.