नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. प्रवाशांनी घेऊन जाणारी बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून 14 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. बुडालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांचा शोध घेण्यात येत आहे. राजस्थानमधील बूंदी जिल्ह्याच्या सीमालगत भागात असलेल्या गोठडा कला गावाजवळ ही मोठी दुर्घटना घडली आहे.
चंबळ नदीत बोट उलटली असून बोटीमध्ये जवळपास 25 ते 30 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बोट उलटल्याचं दिसताच तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी बुडालेल्या लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच तातडीने या घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला देण्यात आली. पोलीस आणि NDRF टीम घटनास्थळी दाखल झाली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर काहींचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
वेगाने बचावकार्य सुरू
बोट उलटतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नदीकिनारी बचावकार्य सुरू आहे. गोठडा गावातून चंबळ नदी ओलांडत असताना अचानक बोट एका बाजूने उलटली आणि दुर्घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत असून त्यांचा शोध सुरू आहे. तर 10 अधिक लोकांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.
बुधवारी (16 सप्टेंबर) सकाळी साधारण 9 च्या सुमारास ही बोट उलटल्याची माहिती मिळत आहे. बोटीमध्ये महिला, पुरुष, लहान मुलांसह वृद्धांचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. बोटीत असलेल्या प्रवाशांची तसेच बुडालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बोट कशी उलटली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"कोरोनाच्या काळात मोदी सरकारचा 'खयाली पुलाव', संकटातील 'संधी'", राहुल गांधींचा हल्लाबोल
CoronaVirus News : 1 ऑक्टोबरपासून देशभरात चित्रपटगृह सुरू होणार?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य
"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"