शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

VIDEO : चिनूकने दाखवली शक्तीची चुणूक, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर थेट उचलून नेले

By बाळकृष्ण परब | Published: October 17, 2020 1:52 PM

Chinook helicopter News : जगातले सर्वात ताकदवान चॉपर मानल्या जाणाऱ्या चिनूक हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील केदारनाथ येथे अपघातग्रस्त झालेले हेलिकॉप्टर थेट उचलून नेले

ठळक मुद्देभारतीय हवाई दलाच्या ताफ्यात असलेल्या चिनूक हेलिकॉप्टरने पुन्हा एकदा आपल्या शक्तीची चुणूक दाखवलीचिनूक हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील केदारनाथ येथे अपघातग्रस्त झालेले हेलिकॉप्टर थेट उचलून नेले २०१८ मध्ये केदारनाथमधील हेलिपॅडजवळ एका खांबाला आदळून हवाई दलाच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरला अपघात झाला होता

केदारनाथ (उत्तराखंड) - भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात असलेल्या चिनूक हेलिकॉप्टरने पुन्हा एकदा आपल्या शक्तीची चुणूक दाखवली आहे. जगातले सर्वात ताकदवान चॉपर मानल्या जाणाऱ्या चिनूक हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील केदारनाथ येथे अपघातग्रस्त झालेले हेलिकॉप्टर थेट उचलून नेले आहे.२०१८ मध्ये केदारनाथमधील हेलिपॅडजवळ एका खांबाला आदळून हवाई दलाच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या अपघातात लागलेल्या आगीत हे हेलिकॉप्टर जळाले होते. दरदम्यान, या हेलिकॉप्टरचा सांगाडा घटनास्थळावरच होता. अखेर दोन वर्षांनंतर चिनूकच्या मदतीने या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा सांगाडा उचलून नेण्यात यश मिळाले आहे.

दरम्यान, चिनूक हेलिकॉप्टर एमआय-१७ हेलिकॉप्टरचा सांगाडा उचलून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून या हेलिकॉप्टरच्या शक्तीची कल्पना येऊ शकते. पाहा व्हिडीओ.

सप्टेंबर 2015मध्ये भारताची बोइंग आणि अमेरिकी सरकारबरोबर 15 चिनूक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासंदर्भात करार झाला होता. त्यानंतर ऑगस्ट 2017ला संरक्षण मंत्रालयानं अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर आणि 15 चिनूक मालवाहू हेलिकॉप्टरसह शस्त्रास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी अमेरिकेला 4168 कोटी रुपये देण्यास मंजुरीही दिली होती. अमेरिकेचे सैन्य दीर्घकाळापासून अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहे. दोन्ही हेलिकॉप्टरचा वापर कित्येक देश करतात.दरम्यान, दीड वर्षापूर्वी भारताच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून या हेलिकॉप्टरचा वापर भारतीय हवाईदलाकडून उत्तर सीमेवर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.अशी आहेत चिनूकची वैशिष्ट्येअमेरिकन लष्कर जेव्हा युद्धावर असते तेव्हा शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे, सैन्याला रसद पोहोचवणे मेडिकल आणि तशाच काही महत्त्वपूर्ण सेवा पुरवणे असा विविध गोष्टींसाठी चिनूकचा वापर केला जातो. अत्यंत वेगवान तितकेच चपळ असलेले हे हेलिकॉप्टर जगातले सर्वात ताकदवान चॉपर असल्याचे मानले जाते. चिनूक हेलिकॉप्टरची ताकद जगातल्या सर्वच देशांच्या लष्कराला परिचित आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलKedarnathकेदारनाथIndiaभारत