नवी दिल्ली - देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. देश कोरोनच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. तसेच वेळप्रसंगी काही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. याच दरम्यान अनेक ठिकाणी धक्कादायक घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे.
दिल्लीमध्ये चोरीची एक घटना समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे गुंडांनी पोलिसावर गोळीबार केला. मात्र तरीही मागे न हटता एका पोलिसाने गुंडांचा तब्बल दीड किलोमीटर पळत पाठलाग केला आणि अखेर दोन गुंडांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. ही संपूर्ण थरारक घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गुंडांचा पाठलाग करत असताना पोलिसावर वारंवार गोळीबार केला जात होता. मात्र पोलिसाने जीवाची पर्वा न करता गुंडांचा पाठलाग सुरूच ठेवला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
दिनेश शर्मा असं या कॉन्स्टेबलचं नाव असून सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे. दिल्लीच्या वरिष्ठ पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक गुंड धावत असल्याचे दिसून येत आहे. त्याला पकडण्यासाठी मागून एक पोलीसही धावत आहे. गुंडाच्या हातात बंदुक असून तो गोळ्या झाडत आहे. मात्र अशा परिस्थितीत पोलिसाने त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. या घटनेनंतर दिनेश यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये ही घटना घडली. दोन गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत एका व्यक्तीची बाईक चोरली. या व्यक्तीने तातडीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. याच दरम्यान कॉन्स्टेबल दिनेश यांची बाईकवर नजर पडली. पोलिसांना पाहून गुंडांनी बाईकचा वेग वाढवला आणि ते पळू लागले. काही वेळाने घाबरून त्यांनी बाईक रस्त्यातच ठेवली आणि पळू लागले. या वेळी दिनेश यांनी दीड किलोमीटर गुंडाचा पाठलाग केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
India China Faceoff : मोदी सरकार चीनविरोधात अॅक्शन मोडमध्ये, 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 3 महिने पगार नसल्याने दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या
CoronaVirus News : कोरोनाच्या भीतीने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल अन्...
"हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे", नितेश राणेंचा हल्लाबोल
"भविष्यात अपयशाच्या केस स्टडीमध्ये कोरोना, GST आणि नोटबंदी शिकवलं जाईल"