नवी दिल्ली - तरुणीची छेड काढणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने त्याला सर्वांसमोर चांगलीच अद्दल घडवली आहे. छेड काढून बाईकवरून पळून जाणाऱ्या एका तरुणाला तिने चांगलाच धडा शिकवल्याची घटना समोर आली आहे. बाईकवरून आलेल्या तरुणाने तरुणीला धक्का मारून छेड काढण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरून चाललेल्या तरुणीला पाठीमागून धक्का मारून तो बाईकवरून निघून गेला. या प्रकाराने संतापलेल्या तरुणीने आरडाओरडा करत तरुणाचा पाठलाग सुरू केला. त्याला गाठलं आणि माफी मागायला लावून उठाबशा काढायल्या लावल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील धनबादमध्ये एक तरुणी रस्त्यावरून चालत होती. संध्याकाळच्या सुमारास तरुणीची बाईकवरून चाललेल्या एका तरुणाने छेड काढली. तरुणी रस्त्याने चालत असताना तो आपली बाईक तिच्याजवळ घेऊन आला आणि पाठीमागून तिला धक्का देत पुढे निघून गेला. या प्रकाराने तरुणीचा संताप झाला आणि तिने या तरुणाला चांगलीच अद्दल घडवायचे ठरवले. तरुणीला मदत करण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मदत केली आणि तरुणाला पकडले. तिने आणि जमलेल्या लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला.
तरुणाला जमावाने पकडल्यानंतर तो दारुच्या नशेत असल्याचं समजलं. सुरुवातीला त्याने तरुणीची छेड काढल्याचं मान्यच केलं नाही. तरुणाला जमलेल्या लोकांनी चोप दिला. तरुणीने त्याला कान पकडून माफी मागायला लावली तसेच सर्वांसमोर उठाबशा काढाला लावल्या. तरुणाने माफी मागितल्यानंतरच जमावाचा राग शांत झाला आणि या तरुणाची सुटका झाली. तरुणीची सार्वजनिक ठिकाणी छेड काढणं त्याला चांगलंच महागात पडलं. तसेच तरुणीने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.