ऑनलाइन लोकमत -
शिमला, दि. 12 - हिमाचल प्रदेशातील कांगरा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेला आहे. मुसळधार पावसामुळे नदीची पातळी वाढली होती. नदीला पूर आल्याने पाण्याच्या प्रवाहात हा पूल वाहून गेला. हिमाचल प्रदेशमधील नुपूर तालुक्याला शेजारच्या पंजाबशी जोडणारा हा पूल 44 वर्ष जुना होता.
पुलाला तडे गेल्याचं लक्षात आल्याने प्रशासनाने अगोदरच अलर्ट जारी केला होता. त्यामुळे पूल वाहून गेला तेव्हा कोणीही पुलावर उपस्थित नव्हतं.
हा पूल वाहून जाताना पाहून महाडमधील पुल दुर्घटना आठवते. महाडच्या सावित्री नदीवरील पूल 2 ऑगस्टला वाहून गेला होता. नदीत एसटी बस आणि वाहनेदेखील वाहून गेली होती. आतापर्यंत 26 मृतदेह हाती लागले आहेत. तब्बल 9 दिवसानंतर शोधकार्यादरम्यान एसटी बसचे अवशेष हाती लागले आहेत.