ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - लग्न हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असतो. पती-पत्नी दोघांसाठी लग्नाच्या दिवसाच्या आठवणी खास असतात. लग्नानंतर अनेकवर्षांनीही या आठवणी दोघांच्या मनात ताज्या असतात.
अशाच एका पंजाबी लग्न सोहळयात घडलेली घटना पती-पत्नीला लक्षात ठेवायला अजिबात आवडणार नाही पण या लग्नाला उपस्थित असलेले पाहुणे मात्र कायम लक्षात ठेवतील.
गुरुव्दारामध्ये संपन्न झालेल्या विवाहात रितीनुसार वधू-वर सात फेरे घेत असताना अचानक नव-या मुलाच्या पायजम्याची नाडी सुटली. त्यामुळे नवरदेव फेरे घेताना एकाहाताने सुटणारा पायजमा सावरत होता. तेवढयात नवरदेवाची आई पुढे आली आणि तिने सुटणा-या पायजम्याची नाडी बांधली.
या प्रसंगाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या घटनेला नवरदेवाने हसण्यावारी नेले असले तरी, त्याची काय स्थिती झाली असेल ते त्यालाच ठाऊक....!