शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'हवेत' लग्नाचा घाट घालणं पडलं महागात; व्हायरल व्हिडिओनंतर डीजीसीएने दिले चौकशीचे आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 19:31 IST

DGCA orders inquiry after viral video : एअरलाईनला ज्यांनी या विवाहसोहळ्यात कोरोना नियमांना हरताळ फसला त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. 

ठळक मुद्देचार्टर्ड फ्लाइटमधील लग्नाने अनेकांचे मन जिंकले परंतु कोविड-सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील रुग्ण संख्या वाढली आहे आणि त्यामुळे अनेक राज्यांची पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले आहेत. त्यात लग्नसमारंभातली फक्त मोजक्याच व्यक्तिंना परवानगी दिली आहे. पण, यातूनही एका पठ्ठ्यांन भन्नाट मार्ग शोधून काढला. लग्न हे एकदाच होतं आणि ते दणक्यात व्हायलाच हवं, त्यासाठी चेन्नईत पठ्ठ्यानं संपूर्ण विमान बूक केलं आणि हवेत लग्न केलं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे आणि त्या त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळली जाते. पण या व्हिडिओत गर्दी दिसत असून डीजीसीएने (नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय) यांनी हवेतील या  विवाहाबद्दल तपास सुरू केला आहे. विमान कंपनी व विमानतळ प्राधिकरणाकडून त्याचा संपूर्ण अहवाल मागविला आहे. एअरलाईनला ज्यांनी या विवाहसोहळ्यात कोरोना नियमांना हरताळ फसला त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. 

चार्टर्ड फ्लाइटमधील लग्नाने अनेकांचे मन जिंकले परंतु कोविड-सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल याप्रकरणी चौकशी सुरू आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने अहवाल मागितला आहे आणि स्पाइसजेट विमानाच्या क्रूची चौकशी केली जाणार असल्याची माहिती एएनआयने दिली आहे. स्पाइसजेट आपली बाजू मांडताना म्हणतं की, प्रवाशांनी वारंवार विनंती करूनही नियमांचे पालन केले नाही म्हणून वधू, वर आणि त्यांच्या कुटुंबियांना कारवाईचा सामना करावा लागू शकतो.

लग्न सोहळ्यातील कुटुंबिय, नातेवाईक आणि पाहुणे सर्वजण बोइंग 737 विमानात होते, असे फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. तामिळनाडूच्या मदुराई येथील या भन्नाट लग्नानं आता संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. लग्नासाठी या जोडप्यानं मदुराई ते बँगलोर अशा प्रवासासाठी संपूर्ण विमान बूक केलं आणि जेव्हा हे विमान मदुराई मिनाक्षी अम्मन मंदिरावरून जात होतं, तेव्हा कपलनं एकमेकांशी विवाह केला. या विमानात १६१ नातेवाईकांची उपस्थिती होती. राकेश-दक्षिणा हे दोघंही मदुराई येथे राहणारे आहेत. त्यांनी आकाशात लग्न करण्यासाठी दोन तास विमान भाड्यानं घेतलं. तामिळनाडूतील कोरोना नियमांपासून वाचण्यासाठी हा घाट घातला गेला. सर्व नातेवाईकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होते. या व्हिडीओत नवरदेव वधुला मंगळसूत्र घालताना दिसत आहेत.

 

 

टॅग्स :marriageलग्नspicejetस्पाइस जेटTamilnaduतामिळनाडूSocial Viralसोशल व्हायरल