विशाखापट्टणम : विशाखापट्टणमध्ये भर समुद्रात जहाजांना पाणी पुरविणाऱ्या जहाजाला भीषण आग लागली. यामुळे जीव वाचविण्यासाठी या पेटत्या जहाजावरील खलाशांनी समुद्रात उड्या मारल्या. या खलाशांपैकी एक जण बेपत्ता झाला आहे.
आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टणमच्या समुद्रात आज सकाळी 11.30 च्या सुमारास समुद्रातील जहाजांना अन्न, पाणी पुरविणाऱ्या जहाजाला आग लागली. यामुळे या जहाजावरील 29 कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. यापैकी 28 जणांना कोस्ट गार्डने वाचविले असून यापैकी 1 जण बेपत्ता झाला आहे. जहाजावरील आगीवरही नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण समजलेले नाही.