वलसाड : एकीकडे एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असताना गुजरातमधील एका भजनाच्या कार्यक्रमात पैशांचा पाऊस पाडला आहे. लोकांनी तब्बल 50 लाख रुपये उधळले आहेत. हा व्हीडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. महत्वाचं म्हणजे उधळण्यात आलेले पैसे नव्या स्वरुपातील 200 आणि 500 च्या नोटा होत्या. अवघ्या काही मिनिटातच या नव्या नोटांनी हे संपूर्ण स्टेज भरुन गेलं. कलवाडा गावात गायक ब्रिजराजदान आणि लोकगायिका गीता रबारी यांच्या कार्यक्रमात हे पैसे उधळण्यात आले.