कधी, काय होईल हे सांगता येत नाही, आयुष्याचा नेमच नाही. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. भोपाळमध्ये नाचणाऱ्या, गाणाऱ्या एका अधिकाऱ्याचा अचानक मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक फेअरवेल पार्टी सुरू आहे, ज्यामध्ये सर्व अधिकारी धमाल करत नाचत आहेत.
अधिकाऱ्यांची धमाल सुरू असतानाच असं काही घडतं, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात जे तुम्हाला हसवतात. पण काही व्हिडीओ असे असतात की ते पाहिल्यावर काळजी वाटू लागते. आजकाल भोपाळमध्ये नाचताना आणि गाताना एका अधिकाऱ्याच्या मृत्यूचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक पार्टी सुरू आहे ज्यामध्ये अनेक लोक 'बस आज की रात है जिंदगी' गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
नाचणाऱ्या लोकांमध्ये पिवळा शर्ट आणि काळे नेहरू जॅकेट घातलेला टपाल खात्याचा एक अधिकारीही त्याच्या मित्रांसोबत नाचत असतो. पण अचानक असे काही घडते ज्याची कल्पना कोणीही केली नसेल. मस्तीत नाचणारे अधिकारी अचानक जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला असं म्हटलं जात आहे. ज्यामुळे हे गाणे त्याच्या आयुष्यासाठी खरं ठरलं.
सुनील वीर नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्यक्रमादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या अधिकाऱ्याचे नाव सुरेंद्र कुमार दीक्षित असं आहे. टपाल विभागाचे अधिकारी असून ते सहायक संचालक म्हणून काम करत होते. व्हिडिओमध्ये त्याची विनोदी शैली स्पष्टपणे दिसत आहे आणि लोकही त्याच्यापासून प्रेरित होत नाचत होते. पण बस आज की रात है जिंदगी या गाण्यावर नाचत असताना त्यांना मृत्यूने गाठलं. याआधी देखील अशा घटना घडल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"