नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 20 लाखांच्या वर गेली आहे. तर हजारो लोकांना या व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशाच वेळी माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे.
रुग्णालयाबाहेर उपचारासाठी बसलेल्या एका वृद्ध महिलेला सिक्युरिटी गार्डने बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपचार मिळावेत म्हणून एक वृद्ध महिला रुग्णालयाबाहेर गेटवर बसून होती.
सिक्युरिटी गार्डने या महिलेला तिथून हाकलले. मात्र तरीही उपचारासाठी ही महिला विनंती करू लागली. संतापलेल्या गार्डने या महिलेला बेदम मारहाण केली आहे. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच रुग्णालयाने सिक्युरिटी गार्डवर निलंबनाची कारवाई केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
JEE Main 2020 Exam : जेईई विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
'योगी आदित्यनाथांनी माफी मागावी'; मशिदीबद्दलच्या 'त्या' विधानावरून विरोधक आक्रमक
CoronaVirus News : तुमच्यापर्यंत कशी पोहोचवणार कोरोना लस?, 'या' खास प्लॅनसह असणार मोदी सरकारची नजर
"निवडून आलेल्या आमदारांना धमकावलं जातंय, सरकार आपल्याच नेत्यांचे फोन टॅप करतंय"