Video : हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली, प्रचारसभेत स्टेजवरच घटना घडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 12:28 IST2019-04-19T11:32:05+5:302019-04-19T12:28:33+5:30
हार्दिक पटेल सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत.

Video : हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली, प्रचारसभेत स्टेजवरच घटना घडली
अहमदाबाद - पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावण्यात आली आहे. गुजरातच्या सुरेंद्र नगरमधील प्रचारसभेदरम्यान, एका अज्ञान व्यक्तीने हार्दिक यांच्या कानाशिलात लगावली. हार्दिक यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते गुजरातमधीलकाँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत.
हार्दिक पटेल सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस उमेदवारास निवडणूक देण्याचं आवाहन ते मतदारांना करत आहेत. त्यासाठीच, आज सुरेंद्र नगर येथे सभा घेत असताना, स्टेजवरुन चढून एका मध्यमवयस्क व्यक्तीनं हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अद्याप, त्या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, ती व्यक्ती भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला आहे.
भाषणावेळी हार्दिक पटेलच्या कानशिलात भडकावली#HardikPatel#LokSabhaElections2019#gujratpic.twitter.com/yUgxfQle0d
— Lokmat (@MiLOKMAT) April 19, 2019
याप्रकरणी हार्दिक पटेल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
Congress leader Hardik Patel files complaint with police after he was slapped during a rally in Surendranagar, Gujarat, earlier today. pic.twitter.com/ioZNWMjZy2
— ANI (@ANI) April 19, 2019