शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 6:25 PM

Jammu Kashmir : हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली

Jammu Kashmir : इस्रायलने शुक्रवारी(दि.27) लेबनॉनची राजधानी बेरुत येथे हवाई हल्ला करुन हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह (Hassan Nasrallah) याचा खात्मा केला. त्यानंतर त्याचा चुलत भाऊ हाशिम सफिदीन याला हिजबुल्लाचा प्रमुख घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, नसराल्लाहच्या मृत्यूचे पडसाद आपल्या जम्मू-काश्मीरमध्येही पाहायला मिळत आहे. या घटनेविरोधात येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी 'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार,' असे म्हटले.

नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख

जम्मू-काश्मीरमध्ये निदर्शने न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, हसन नसरल्लाह याच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये लोकांनी रस्त्यावर जोरदार निदर्शने केली. यावेळी लोकांच्या हातात नसराल्लाह याचे पोस्टरही होते. याशिवाय जुन्या श्रीनगर शहरासह राज्यातील इतर भागातही अशीच निदर्शने झाली.

'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार'यावेळी एका आंदोलक विद्यार्थ्यींनीने इस्रायलवर संताप व्यक्त केला. "मी पॅलेस्टाईनच्या विरोधात असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी बोलत आहे. लेबनॉनच्या लोकांनी अजिबात चिंता करू नये. आम्ही त्यांची साथ कधीही सोडणार नाही. तुम्हाला माहित नाही, तुम्ही कोणाला शहीद केले आहे. आता प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघेल," असे ती म्हणाली.

दरम्यान, इस्रायली वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, नसराल्लाहशिवाय त्याची मुलगी झैनब हिचाही या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इस्रायलने हल्ला केलेल्या कमांडर सेंटरमध्ये नसरल्लाह याच्यासह मुलीचाही मृतदेह सापडला होता. नसराल्लाह आणि इराण समर्थित गटाचे इतर अनेक नेते लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये एका बंकरमध्ये जमले असताना इस्रायलने हा हल्ला केला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIsraelइस्रायलIndiaभारत