शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

Video - हायव्होल्टेज ड्रामा! प्रियकराशी भांडण होताच प्रेयसी थेट टॉवरवर चढली, रुसून बसली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 10:48 AM

संतापलेली विवाहित प्रेयसी हायटेन्शन टॉवरवर चढली, त्यानंतर तिचा प्रियकरही तिची समजूत घालण्यासाठी तिच्या मागे टॉवरवर चढला

छत्तीसगडच्या कोडगार गावात प्रियकर-प्रेयसीचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. संतापलेली विवाहित प्रेयसी हायटेन्शन टॉवरवर चढली, त्यानंतर तिचा प्रियकरही तिची समजूत घालण्यासाठी तिच्या मागे टॉवरवर चढला. हे प्रकरण पेंड्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरेला पोलीस स्टेशन हद्दीतील नेवरी नवापारा येथे राहणाऱ्या अनिता भैना हिचे कोडगार गावातील रहिवासी मुकेश भैनासोबत गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते. 

अनिता विवाहित आहे. 6 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं, मात्र पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिचे मुकेशसोबत प्रेमसंबंध होते.काही दिवसांपूर्वी प्रेयसी अनिता तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी कोडगार गावात आली होती. दोघेही एकाच घरात एकत्र राहत होते. गुरुवारी दोघांमध्ये कशावरून वाद झाला. यामुळे संतापलेल्या महिलेने घर सोडलं आणि शेतातील हायटेन्शन टॉवरवर चढली. ती टॉवरवर जाऊन बसली.

काही ग्रामस्थांनी टॉवर पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून महिलेला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यांना दूरवरून ती महिला ओळखता आली नाही. इकडे महिला हायटेन्शन टॉवरवर चढल्याची चर्चा गावात पसरली. हळूहळू गावकरी मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. दरम्यान प्रियकर मुकेश भैनाही टॉवरजवळ पोहोचला. अनिताला पाहताच त्याने तिला ओळखले आणि तिची समजूत घालण्यासाठी तोही हायटेन्शन टॉवरवर चढला. 

प्रियकर महिलेची समजूत घालत होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर ती थोडी खाली आली. दोघही टॉवरच्या मध्यभागी येऊन बसले. लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पेंड्रा पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मनारायण तिवारी यांनी सांगितले की, हायटेन्शन टॉवरमध्ये विजेचा प्रवाह सतत सुरू होता, मात्र कोणतीही दुर्घटना घडली नाही ही दिलासादायक बाब आहे. दोघांची चौकशी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. किरकोळ वादातून महिलेने असे पाऊल उचलले होते. आता तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलChhattisgarhछत्तीसगड