श्रीकाकुलम : अवघे जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. जगापेक्षा भारतात मृत्यूंची संख्या कमी असल्याने लोकांच्या मनातील भीती कमी होत आहे. मात्र, माणुसकी ठार मेल्यातच जमा झाली आहे की काय असा प्रश्न आंध्र प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे उपस्थित होऊ लागला आहे.
कोरोनाचा धोका वृद्धांना अधिक आहे, असे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, कोरोनाचा धोका तरुणाईलाही असल्याचे मृत्यूंच्या आकडेवारीवरून दिसून आले. आंध्रप्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलासा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अमनवीय कृत्य केले आहे. 70 वर्षांच्या वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचा मृतदेह नेण्यासाठी माणसे धजावेनात. यामुळे जेसीबीने या वृद्धाचा मृतदेह उचलून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर श्रीकाकुलम जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पलासा पालिका आयुक्त आणि स्वच्छता निरिक्षकाला तत्काळ निलंबित केले आहे. या घटनेवरून कोरोनाने माणुसकी संपविल्याचे दिसून येत आहे.
देशाला हादरवणारी आकडेवारी
देशात लॉकडाऊन उठविण्याचा दुसरा टप्पा तोंडावर आला असताना कोरोनाच्या आकडेवारीने भयभीत केले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे 18552 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. धक्कादायक म्हणजे हा वेग प्रचंड आहे. गेल्या 24 तासांत विक्रमी वाढ पहायला मिळालेली असताना 384 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशात सध्या 197387 रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 508953 वर गेला आहे. तर 295881 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण मृतांचा आकडा 15685 झाला आहे.
सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले असून दिल्लीचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिल्या रुग्णांची नोंद झाली होती, त्यानंतर आज (शुक्रवारी) दिवसभरात तब्बल ५ हजार २४ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १७५ मृत्यू झाले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ५२ हजार ७६५ झाली असून बळींचा आकडा ७ हजार १०६ इतका झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२५ टक्के झाले असून सध्या ६५ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के इतका आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
देश हादरला! भारतात कोरोना रुग्णांनी ओलांडला पाच लाखांचा टप्पा
बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का
India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे
Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार
पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित
CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी
चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते