ऑनलाइन लोकमत
श्रीहरीकोट्टा, दि. २६ - भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. सोमवारी सकाळी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन इस्त्रोने पीएसएलव्ही-सी३५ या प्रक्षेपकाव्दारे एकाचवेळी आठ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले.
उड्डाणानंतर १७ मिनिटांनी पीएसएलव्ही-सी ३५ ने 'स्कॅटसॅट-१' या भारताच्या अत्याधुनिक हवामान उपग्रहाला अवकाश कक्षेत प्रस्थापित केले. इस्त्रोचे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे लाँच मिशन आहे. दोन तास १५ मिनिटाच्या या मिशनमध्ये प्रथमच पीएसएलव्ही-सी३५ दोन वेगवेगळया कक्षांमध्ये अन्य सात उपग्रह प्रस्थापित करणार आहे.
आणखी वाचा
पीएसएलव्हीचे हे ३७ वे उड्डाण असून, सकाळी ९.१२ मिनिटांनी पीएसएलव्ही-सी३५ अवकाशाच्या दिशेने झेपावले. 'स्कॅटसॅट-१' कडून हवामाना बरोबर वादळ आणि त्याच्या स्थितीची पूर्वसूचना मिळणार आहे.
एकूण आठ उपग्रहांमध्ये तीन भारताचे, तीन अल्जेरियाचे, कॅनडा आणि अमेरिकेचा प्रत्येकी एक उपग्रह आहे. एकाचवेळी अनेक उपग्रह प्रक्षेपित केले तरी ते एकाच कक्षेत प्रस्थापित केले जातात. पण यावेळी इस्त्रोलो दोन वेगवेगळया कक्षांमध्ये उपग्रह प्रस्थापित करायचे आहेत. हेच या मोहिमेतील इस्त्रोपुढील मुख्य आव्हान आहे.
#WATCH ISRO successfully launches PSLV'S longest flight with SCATSAT-1 & other 7 satellites on board pic.twitter.com/8Kp1eazSr2— ANI (@ANI_news) September 26, 2016